Fig MilkShake recipe /अंजीराचा मिल्क शेक/Fresh Fig Milk Shake/अंजीर फळाचे होणारे शरीरास फायदे तोटे

अंजीर फळाबाबतची माहिती
अंजीर सेवनाने शरीरास होणारे फायदे तोटे
अंजीर हे उष्ण प्रदेशातील फळ असल्या कारणाने उत्कृष्ट जातीची फळे हि अरबस्थानात, इराण, इराक ,ग्रीस तुर्कस्थानात येतात . भारतात याची लागवड पुणे जिल्हात तसेच खान्देशात ,ऊत्तर प्रदेशात केली आहेत पण ड्रायफ्रूट सुकी अंजिरे हि अरबस्थान,इराक इराण वगैरे ठिकाणी होतात व सर्वठिकाणी पाठवली जातात आपल्या कडे भारतात पण जी सुकी अंजिरे येतात ती तिकडूनच ,अंजिराच्या विविध जाती आढळून येतात गुलांबी ,लाल,काळी ,पांढरी,मोठी,लहान,तुर्की वगैरे आयुर्वेदिक औषधात सुक्या अंजीराचा उपयोग केला जातो
ताज्या अंजिरात पोषक घटक जास्त असतात . सुक्या अंजिरात उपयुक्त क्षार,व जीवनसत्वे असतात व खूप प्रमाणात लोह असते ,
ताज्या अंजिराच्या सेवनाने खालील फायदे मिळतात
१)अंजीराच्या सेवनाने जठर क्रियाशील बनते ,त्या मुळे भूक लागत नसेल तर अंजीर खावे म्हणजे कडकडून भूक लागते .
२)अंजीरात लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने थकवा येत असेल शरीरातील शक्ती क्षीण झाली असेल तर अंजीर सकाळ संध्याकाळ खावे
३)अंजीर क्षय रोग्यांसाठी आरोग्यदायक आहेत अंजीर हे रक्तवर्धक पण आहे त्यामुळे फायदा होतो.
४)मोठे अंजीर हे शितदायी ,गोड ,पित्तविकारक ,रक्तविकारक ,वायू दूर करणारे आहे.पण लहान अंजीर हे विरुद्ध गुणधर्माचे असते.
५)अंजीर रसाने मधुर ,विपाकातही गोड ,शीतवीर्य आणि सारक असतात .रक्तविकारक,दाह ,कफ ,वात नाशक असतात .
६) अंजीर दुधात उकळवून प्यावे म्हणजे अंगात शक्ती येते व रक्त वाढते .
७)रोज थोडी थोडी अंजिरे खाल्याने जुनाट मलावरोध नाहीसा होतो ,शैचास साफ होते व नियमित होते
८)रोज ताजी किंवा सुकी अंजीरे दुधात गरम करून खाल्याने कफ कमी होतो ,शरीरात नवा जोश व नवी शक्ती येते,दमा दूर होतो
९)सुकी अंजीराचे तुकडे ,साले काढलेले बदाम,खडीसाखर ,वेलची पावडर ,केशर,चारोळी ,पिस्ते,व बेदाणे हे सर्व बारीक करून गाईच्या तुपात आठ दिवस भिजवून नंतर रोज २०ग्रॅम मिश्रण खाल्याने शक्ती येते ,धातुवृध्दि ,रक्त वृद्धी होते व अशक्त पणा दूर होऊन नवा जोम येतो .
१०)अंजिराचे पोटीस करून गळू वर बांधल्याने लवकर पिकते .
११)अंजीर हे पचनास जड असल्याने चांगले चावून चावून खावे
१२)अंजिराच्या अति सेवनाने पोटात दुखू शकते कळ येते व कधी कधी मुरडा येऊ शकतो ,व यकृत आमाशयाचे नुकसान होते अंजिराने शरीरात विकृती झाल्यास बदाम खाऊ नयेत



2 Comments

  1. TRUPTI SHRIYAN says:

    Useful information n healthy drink thnx for sharing

Leave a Comment